शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी लाटणे घेतले, तर तुमचे खरे नाही - सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:42 IST

सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला. यावेळी त्यांनी राज यांच्यावर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला.

अहमदनगर : ‘महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका; अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील. त्यांनी लाटणे घेतले तर तुमचे काही खरे नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला. यावेळी त्यांनी राज यांच्यावर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला. त्या म्हणाल्या, आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. आता कोठे अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वत: काहीही कामे करीत नाहीत. केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पहा. त्यावर काहीही हावभाव नसतात. लोकांसमोर हे मराठीचा मुद्दा मांडतात; पण यांची स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. यांच्या व्यासपीठावर एकही महिला नसते. महिलांना यांच्या पक्षात काहीही स्थान नाही. आपल्या राज्याची संस्कृती ही संतांची आहे. कुणी दगड उचलणार असेल तरी आपण विचारांची लढाईच लढली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस