शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे

By शिवाजी पवार | Updated: November 3, 2023 15:47 IST

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.

श्रीरामपूर : भंडारदरा, मुळा तसेच निळवंडे धरणांचेपाणी जायकवाडीत सोडल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे या प्रश्नावर शेतक-यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी दिला आहे. नेवासेचे आमदार शंकरराव गडाख यांनीही याप्रश्नी नगर औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले होते.समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.    श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघ तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे, आदी उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांमध्ये ६० ते ७० टक्के घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह निवेदनही दिले असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.केवळ रब्बीचा हंगाम पाटपाण्याच्या मदतीने घेणे एवढीच छोटीशी आशा आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडेच्या पाण्यावर शेतकऱ्यांना तग धरावा लागेल. शेतकऱ्यांना मान्य नसणाऱ्या अन्यायकारी समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याद्वारे भंडारदरा, मुळा तसेच निळवंडेतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडल्यास शेतकऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील.               जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी असल्याने पाणी सोडण्याची गरज नाही. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. जलसंपदा विभागाने असा निर्णय घेऊ नये, असे पत्र जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता यांना दिल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरDamधरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी