ताप नसेल तर घरी.... आज ३४० जणांना मिळाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:58 IST2020-07-27T11:57:59+5:302020-07-27T11:58:25+5:30
अहमदनगर : ताप नसेल, कोरोनाची लक्षणे नसतील आणि सात दिवस झाले असतील तर आता घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बरे होऊन घरी सोडणाºयांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी सकाळी तब्बल ३४० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तरीही उपचार घेणाºया रुग्णांची संख्या २ हजार २८५ इतकी आहे.

ताप नसेल तर घरी.... आज ३४० जणांना मिळाला डिस्चार्ज
अहमदनगर : ताप नसेल, कोरोनाची लक्षणे नसतील आणि सात दिवस झाले असतील तर आता घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बरे होऊन घरी सोडणाºयांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी सकाळी तब्बल ३४० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तरीही उपचार घेणाºया रुग्णांची संख्या २ हजार २८५ इतकी आहे.
आज सोमवारी सकाळी घरी सोडलेल्या ३४० जणांमध्ये नगर शहरातील २२२ जणांचा समावेश आहे. संगमनेर (३१), राहाता (१८), पाथर्डी (२), नगर ग्रामीण (१८), श्रीरामपूर (११), कन्टोनमेंट (७), नेवासा (२),श्रीगोंदा (५), पारनेर (९), अकोले (१), राहुरी (९), शेवगाव (४), कोपरगाव (१) येथील रुग्णांनाही आज डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्याने जिल्ह्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे.