रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:26+5:302021-09-02T04:45:26+5:30
गेल्या दोन वर्षांपासून नगर- मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात कृती समितीच्या माध्यमातून महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध आंदोलने केले. दरवर्षी ...

रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक करणार आंदोलन
गेल्या दोन वर्षांपासून नगर- मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात कृती समितीच्या माध्यमातून महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध आंदोलने केले. दरवर्षी आंदोलन नंतरच महामार्गावरील खड्डे बुजवली गेली आहेत. २०२० मध्ये कृती समितीच्या आंदोलनानंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी १० कोटींच्या निधीची मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या एका पावसातच १० कोटी खड्ड्यातील पाण्यात वाहून गेले. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात महामार्गावर जीवघेणे खड्डे तयार होतात. याच खड्ड्यात अनेक प्रवाशांचे बळी गेले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नगर- मनमाड महामार्ग पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी ५०० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी गेला कुठे हे आजपर्यंत समजले नाही. महामार्ग पूर्ण दुरुस्ती होणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला होता. मार्च २०२१ पर्यंत महामार्गाचे काम सुरू होणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती, असे निवेदनात म्हटले आहे.
................
१० दिवसात बुजवा खड्डे
१० दिवसाच्या आत खड्डे बुजविले नाही तर पडलेल्या खड्ड्यातच खड्डे खोदून ११ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत खड्ड्यातून एकही कार्यकर्ता बाहेर निघणार नाही. निवेदनाद्वारे वसंत कदम, देवेंद्र लांबे, श्रीकांत शर्मा, सतीश घुले, अमोल वाळूंज, प्रमोद विधाटे, नसीब पठाण, रोहित नालकर, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम, सचिन कदम, नितीन मोरे, विठ्ठल राऊत, दुर्वेश वाणी, संदीप कदम, सुहास भांड, बाबासाहेब खांदे, सुजय पुजारी, संतोष कदम, शिवाजी पटारे यांनी मागणी केली आहे.
(खड्डा)