शनिवारी अकोले येथील पंचायत समिती सभागृहात महावितरणच्या आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी आमदार डाॅ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, राष्ट्रवादीचे भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, स्वाती शेणकर, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता शैलेंद्र मुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर बागुल, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे उपस्थित होते.
लहामटे म्हणाले, भंडारदरा व निळवंडेच्या पाणलोटातील उपसासिंचन योजनांना पुरेशा दाबाने वीज मिळावी. आदिवासी भागात लोंबकळत असलेल्या वीजवाहक तारा व गंजलेले खांब यांची वेळीच दुरुस्ती व्हावी. जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत वीज द्यावी. डाॅ. संजय घोगरे, भागवत शेटे, राजेंद्र कुमकर, रवी मालुंजकर, संदीप शेणकर, विनोद हांडे, विकास बंगाळ, विकास शेटे, संदीप भानुदास शेणकर यांनी काही तक्रारी नमूद केल्या.