सुदाम देशमुख , अहमदनगरअहमदनगर : मूर्ती तयार करणारे अनेक शिल्पकार आहेत. मात्र हालचालीच्या माध्यमातून मूर्ती जीवंत करण्याचे तंत्रज्ञान हे सर्वांनाच जमते असे नाही. मूर्ती जीवंत करण्यासाठी वर्षभर परिश्रम घ्यावे लागतात. गणेशोत्सवात एकाचवेळी अनेक ठिकाणी देखावे तयार करण्याची एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. मुंबई आणि परप्रांतातील कारागीर देखावे तयार करण्यासाठी खास नगरमध्ये तळ ठोकून आहेत. या उद्योगातून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना नगरमधून मिळते आहे. कोणत्या गावचा गणेशोत्सव किती चांगला आहे, याचा मापदंड हा त्या गावामध्ये असलेल्या देखाव्यांवरूनच ठरतो. डिजे, आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मिडियाचा कितीही प्रभाव असला तरी गणेशोत्सवातील देखाव्यांचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. पूर्वी साध्या तंत्राद्वारे हालते देखावे तयार केले जायचे. दोरीच्या सहाय्याने किंवा हातामध्ये दोरी धरून एखादी व्यक्ती पडद्यामागे राहून मूर्ती हालती ठेवली जायची. त्या तंत्रामध्ये बदल होत आता स्वयंचलित हालत्या मूर्ती या आकर्षण ठरत आहेत. नगरमधील पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानने ‘कृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत’ हा भव्य देखावा साकारला आहे. हा देखावा तयार करणारे मूर्तीकार महेंद्र पंधारे हे अंबरनाथ येथून आले आहेत. गत २५ वर्षांपासून त्यांचे व नगरच्या गणेशोत्सवाशी नाते जुळले आहे. त्यांचा अंबरनाथ येथेच मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे. फायबरच्या मूर्ती तयार करण्यात वर्षभर ते व्यस्त असतात. सहा महिन्यांपासूनच देखावे तयार करण्याची आॅर्डर सुरू होते. आयोजकांच्या संकल्पनेप्रमाणे कथानक तयार करून एखाद्या देखाव्यामध्ये किर्ती मूर्ती असाव्यात, हे निश्चित केले जाते. देखाव्यामध्ये किती मूर्ती वापरणार आहेत, यावरूच देखावा तयार करणे आणि तो अॅक्टीव्ह करणे या कामाचे भाडे ठरले जाते. मूर्तीमधील हालचाली करण्याचे एक विशिष्ट तंत्र आहे. वीजेवर चालणारी मोटार वापरून मूर्तीची पाहिजे तशी हालचाल करून घेतली जाते.
हालचालीच्या तंत्रामुळेच मूर्ती जीवंत!
By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST