युथ विथ मिशनचा उपक्रम आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:45+5:302021-06-29T04:15:45+5:30
मुबंई येथील युथ विथ मिशनच्यावतीने सोमवारी बुथ हॉस्पिटल येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधे देण्यात आली. यावेळी आ. जगताप बोलत ...

युथ विथ मिशनचा उपक्रम आदर्शवत
मुबंई येथील युथ विथ मिशनच्यावतीने सोमवारी बुथ हॉस्पिटल येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधे देण्यात आली. यावेळी आ. जगताप बोलत होते. यावेळी डॉ. मारी मुथू, बबन कंबळे, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, जॉन्सन ॲबेनेझर,जिल्हा समन्वयक रॉबर्ट शेलार, अहमदनगर पहिली मंडळी चर्चचे खजिनदार सॅम्युअल खरात, अनिल लष्करे आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले कोरोनाच्या संकट काळात सामाजिक भावनेतून प्रत्येकाने शक्य होईल तेव्हढी गरजूंना मदत करणे गरजेचे आहे.
यावेळी मारी मुथू म्हणाले नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली होती. आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी युथ विथ मिशनने पुढाकार घेऊन नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रावर व जिल्ह्यातील १३ तालुकास्तरावर जाऊन औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर कोरोना संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जणार आहे. यामध्ये नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिनचे औषधे व वाफेचे मशीन तसेच लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
-------------
फोटो २८ औषधे
ओळी- मुबंई येथील युथ विथ मिशनच्यावतीने सोमवारी बुथ हॉस्पिटल येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधे देण्यात आली.