कुकडीबाबत सोमवार (दि. १ जून) पासूनच्या उपोषणावर ठाम, उपोषणस्थळी कोणीही भेट देऊ नका- राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:47 IST2020-05-31T12:45:26+5:302020-05-31T12:47:53+5:30
चौंडी (जि. अहमदनगर)- कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि. १ जून) पासून उपोषण करणार आहे. मी उपोषणावर ठाम आहे. सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसणार आहे, अशी भूमिका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी लोकमतकडे व्यक्त केली,

कुकडीबाबत सोमवार (दि. १ जून) पासूनच्या उपोषणावर ठाम, उपोषणस्थळी कोणीही भेट देऊ नका- राम शिंदे
चौंडी (जि. अहमदनगर)- कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि. १ जून) पासून उपोषण करणार आहे. मी उपोषणावर ठाम आहे. सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसणार आहे, अशी भूमिका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी लोकमतकडे व्यक्त केली,
सध्या कोरोनाचा लॉकडाऊन सुरू आहे, या लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपोषणस्थळी कोणीही येऊ नये. आपापल्या घरात बसूनच शेतकºयांनी उपोषणात सहभागी व्हावे. शेतकºयांचा प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधक स्वरुपात उपोषणाला बसणार आहे. उद्यापासून उपोषण असले तरीही अद्यापपर्यंत प्रशासनाने माझ्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. सर्वांनी घरात बसूनच उपोषणाला पाठिंबा द्यावा.
कुकडीमधून उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत २९ तारखेला प्रशासनाला निवेदन दिले होते. जून महिना उजाडला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नाही. उन्हाळा संपत आला आहे तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असुनही पाणी सोडण्याबाबत नियोजन झाले नाही. त्यामुळे मी नियोजनाप्रमाणे उपोषण करणार आहे.
दरम्यान सहा जूनपासून कुकडीचे आवर्तन सुटणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, तरीही राम शिंदे हे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे दिसते आहे.