या हुसेन..या हुसेनचा... जयघोष करीत नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:34 IST2019-09-10T13:33:30+5:302019-09-10T13:34:17+5:30
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़ या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाली़

या हुसेन..या हुसेनचा... जयघोष करीत नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला प्रारंभ
अहमदनगर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़ या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाली़ ही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी सवा-यांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कोठला येथून छोटे इमामे हुसेन यांच्या सवारीने मोहरम मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर मंगलगेट हवेली येथून मोठे इमामे हसन यांची सवारी निघाली़ सवारी घेऊन जाणा-या भाविकांवर ठिकठिकाणी पाणी आणि फुले टाकण्यात येत होती़ ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ विविध धर्माच्या नागरिकांनी नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी देखील गर्दी केली होती. दरम्यान सोमवारी रात्री कोठला परिसरात कत्तलची रात्रची मिरवणूक काढण्यात आली होती़ यावेळी पारपंरिक पद्धतीने पेटविण्यात आलेले टेंभ्यांची मिरवणूक लक्ष्यवेधी ठरली़ सवा-यांची मिरवणूक सांयकाळी सातपर्यंत दिल्लीगेटच्या बाहेर मार्गस्थ करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे़.
...