पत्नी नांदत नसल्याने पतीचा तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:08 IST2018-02-23T23:08:24+5:302018-02-23T23:08:45+5:30
कौटुंबिक वादातून तक्रार नोंदविण्यास आलेल्या तरुणाने तोफखाना पोलीस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पत्नी नांदत नसल्याने पतीचा तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
अहमदनगर : कौटुंबिक वादातून तक्रार नोंदविण्यास आलेल्या तरुणाने तोफखाना पोलीस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश संपत कराळे (वय २७ रा़शेंडी पोखर्डी ता़ नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ पत्नी नांदत नसल्याने गणेश कराळे हा गुरुवारी सकाळी तोफखाना ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. यावेळी ठाणे अंमलदार ए. बी. घोरपडे यांनी तक्रार कागदावर लिहून देण्यास सांगितले. गणेश मात्र तेथून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तो पुन्हा पोलीस ठाण्यात आला. तेथे पत्नी नांद नसल्याचे तो ओरडून सांगत होता़ यावेळी त्याने खिशातील बाटली काढून त्यातील डिझेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला अडविले.