साईबन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:07+5:302020-12-13T04:36:07+5:30

अहमदनगर : येथील साईबन येथे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर (गुंडेगाव) यांच्या हस्ते श्री साईबाबांची पूजा करून, बाळ-गोपाळ ...

Hurda party and tourism begins at Saiban | साईबन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाला सुरुवात

साईबन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाला सुरुवात

अहमदनगर : येथील साईबन येथे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर (गुंडेगाव) यांच्या हस्ते श्री साईबाबांची पूजा करून, बाळ-गोपाळ पर्यटकांचे फुलांनी स्वागत करून पर्यटनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हुरडा भट्टीची विधिवत पूजा करून हुरडा पार्टी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी निसर्ग पक्षी मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम सातपुते, वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री सतीश लोढा, महावीर इंटरनॅशनल संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश बाफना, साईबनचे संचालक डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया आदी उपस्थित होते. यावेळी भापकर म्हणाले, साईबन हे हिरवाईचे नंदनवन असून डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया यांनी माळरानावर फुलवले आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी, वंदनीय व अनुकरणीय आहे. डॉक्टरकीचा पेशा सांभाळून सामाजिक जाणिवेतून ८० एकरांच्या माळरानावर हजारो वृक्ष फुलवले. साईबनमध्ये प्रसन्न वातावरणात पर्यटक रमतो. त्यास मनशांती मिळते. विचारात देखील सकारात्मक बदल होतात.

डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया यांनी पर्यटकांनी पार्टीसाठी येणाऱ्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. बोटिंग सफारीचा, पपेट शोचा झिप लाइनच्या विविध खेळांचा आनंद लुटावा. पर्यटक व हुरडा पार्टीसाठीची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी आहे, अशी माहिती डॉ. कांकरिया यांनी दिली.

--------

फोटो-१२ साई बन

नगरच्या साईबन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते झाली. समवेत जयराम सातपुते, अमित गायकवाड, सतीश लोढा, रमेश बाफना, डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया आदी.

Web Title: Hurda party and tourism begins at Saiban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.