कोपरगावातील आमरण उपोषण अखेर सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:44+5:302021-01-23T04:20:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी कोपरगाव तहसील येथे विविध मागण्यासाठी १८ ...

The hunger strike in Kopargaon was finally called off | कोपरगावातील आमरण उपोषण अखेर सुटले

कोपरगावातील आमरण उपोषण अखेर सुटले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी कोपरगाव तहसील येथे विविध मागण्यासाठी १८ जानेवारीला आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मध्यस्थीने व छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे यांच्या उपस्थितीत लिंबू पाणी घेऊन वाघ यांनी तीन दिवसांपासून सुरु केलेले उपोषण गुरुवारी (दि.२१) रात्री ९ वाजेच्या सुमारास सोडले आहे. यावेळी वाघ म्हणाले, महसूलमंत्री यांचे सचिव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाला आहे. शासन दरबारी आपल्या मागण्या पाठविले आहे. लवकरच महसूलमंत्री यांची भेट घडून योग्य निर्णय मिळेल.

.............

फोटो२२ - उपोषण सोडले- कोपरगाव

Web Title: The hunger strike in Kopargaon was finally called off