शेवगावात शंभर जणांना काेरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:01+5:302021-01-17T04:19:01+5:30
शेवगाव : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते कोरोना लसीकरणास प्रारंभ ...

शेवगावात शंभर जणांना काेरोना लस
शेवगाव : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शंभर जणांना लस टोचण्यात आली.
यावेळी ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. दिलीप परदेशी, लायन क्लबचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, शेवगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास बेडके, आदी उपस्थित होते.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शेवगाव व बोधेगाव केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मिळून शंभर जणांना लस देण्यात आली. एका वेळेस दहाजणांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात आली. लस दिल्यानंतर अर्धा तास अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या वाॅर्डात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली लाभार्थींना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
शेवगाव तालुक्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३०० ‘कोविशिल्ड’ प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी शंभर लसीचे डोस देण्यात आले. लसीकरणाचा पहिला डोस दिलेल्या लाभार्थ्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय निरीक्षकांच्या डॉ. महेश जायभाय, डॉ. विजय गायकवाड, डॉ. सुरेश घोलप, डॉ. निखिल परदेशी यांच्या पथकाने भेट देऊन लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी केली.
फोटो : १६ शेवगाव कोरोना
शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस दिलेले आरोग्य कर्मचारी.