शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे कालव्यासाठी पाचशे कोटी कसे देणार? साई संस्थानच्या नियोजित प्रकल्पांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:46 IST

भाविकांच्या दातृत्वातून साईसंस्थानची तिजोरी श्रीमंत झाली आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या व नियोजित प्रकल्पांचा विचार करता कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल, अशी गंभीर परिस्थिती आहे. पाचशे कोटी निळवंडे कालव्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. 

प्रमोद आहेर । शिर्डी : भाविकांच्या दातृत्वातून साईसंस्थानची तिजोरी श्रीमंत झाली आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या व नियोजित प्रकल्पांचा विचार करता कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल, अशी गंभीर परिस्थिती आहे.सध्या संस्थानकडे विविध बँकामध्ये २२०० कोटींच्या ठेवी आहेत. यातून मिळणा-या व्याजावर कर्मचा-यांचे पगार होतात. संस्थानच्या सध्याच्या सहाशे कोटी रुपयांच्या उत्पन्नात या व्याजाचा हिस्सा पंचवीस टक्के आहे. सध्या संस्थानचा ११२ कोटींची दर्शनबारी, २१८ कोटींचा शैक्षणिक संकुल व २५ कोटींचा रूग्णालय विस्तारीकरण प्रकल्प सुरू आहे. पाचशे कोटी निळवंडे कालव्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. संस्थानला आयकर विभागाकडून ४०० कोटी दंडाची नोटीस आलेली आहे.शिर्डी व संस्थानला उर्जितावस्था आणू शकणारा साईसृष्टी प्रकल्प कन्सल्टंट नेमण्याच्या टप्प्यावर आहे. त्यासाठी दोनशे कोटी अपेक्षित आहेत़ रूई शिवारात लवकरच वीस एकर जागा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंधरा कोटी रूपये लागणार आहेत. या लगत संस्थानची पंधरा एकर जागा आहे. येथे चारशे कोटी खर्चून सुपरस्पेशालिटी रूग्णालयासह संपूर्ण मेडिकल कॅम्पस करण्याचे प्रयोजन आहे.संस्थानच्या प्रसादालयालगत शेती महामंडळाची जागा जवळपास साठ कोटी रूपये खर्चूून खरेदी करण्यात येणार आहे. महामंडळाने हिरवा कंदील दाखवला तर आणखी जागा घेण्याचा प्रस्ताव आहे. नगरपंचायतने शहरातील रस्ते भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी केली आहे. साईबाबा संस्थान ही परिसराची कामधेनू आहे. कर्मचा-यांच्या बरोबरच हजारोंची रोजी रोटी व करोडोंच्या श्रद्धा संस्थानशी जोडल्या गेल्या आहेत. यामुळे कोरोनानंतर साईसंस्थान, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना आपल्या जुन्या भूमिकांचा फेर आढावा घेऊन नव्या वाटा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.आर्थिक मंदीमुळे देणगीदार घटणार    मंदिर सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, याचा सध्या अंदाज नाही. त्यातच जागतिक आर्थिक मंदीमुळे देणगीवरही परिणाम होऊ शकतो़. संस्थानचे सध्या सुरू असलेले व नियोजित प्रकल्प मार्गी लागले तर तिजोरीत अवघे शंभर कोटीही राहतील की नाही, याबाबत शंका आहे. अशावेळी संस्थानवर केवळ पगार कपातीची नाही तर तिरूपती संस्थानप्रमाणे कामगार कपातीची वेळ येऊ शकते. सध्या संस्थानचा आस्थापना खर्च दहा टक्क्यापेक्षा अधिक असल्याचे संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर