...अभ्यास तरी किती दिवस करायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:44+5:302021-04-18T04:19:44+5:30
- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव. --------- दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी ...

...अभ्यास तरी किती दिवस करायचा?
- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव.
---------
दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मग, दहावीच्या परीक्षेचा अट्टाहास का? कोरोना काळात विद्यार्थ्यांचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. एक तर वर्षभर शाळेत शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे माध्यमिक व इतर वर्गांप्रमाणे दहावीचीही परीक्षा न घेता वर्षभरातील शाळेतील गुणांच्या सरासरीचे अवलोकन करून याही विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा, हीच अपेक्षा.
- दिलीप फलके, माजी प्राचार्य.
...
वारंवार पुढे जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे अभ्यासावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होते. पुढच्या तारखेची अनिश्चितता यामुळे एकाग्रता भंग होते आहे. आधीच ऑनलाइन पद्धतीने शिकताना आलेल्या अडचणींत नव्याने या गोंधळाची भर पडते आहे. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, असे वाटते.
- कौस्तुभ बोडखे, विद्यार्थी, बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव.
....