जल जीवन मिशनअंतर्गत घराघरात नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:30+5:302021-07-23T04:14:30+5:30
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ...

जल जीवन मिशनअंतर्गत घराघरात नळजोडणी
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपद्वारे गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देणार आहेत. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करून येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरीता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) परिक्षित यादव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी केले आहे.