चाकूने हल्ला करत लुटले सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:36 IST2021-02-18T04:36:49+5:302021-02-18T04:36:49+5:30
याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब दगडू ढगे (वय ६२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा ...

चाकूने हल्ला करत लुटले सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे घर
याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब दगडू ढगे (वय ६२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ढगे व त्यांची पत्नी हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. चोरटे घरातून जात असताना ढगे व त्यांची पत्नी घरी आले. त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी ढगे यांच्या हातावर, तर त्यांच्या पत्नीच्या तोंडावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. ढगे दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कणसे हे पुढील तपास करत आहेत. भरदिवसा धाडसी चोरी चोरी झाल्याने हिंगणगाव परिसरात घबराट पसरली आहे.