पोलीस आल्याने हॉटेल मालकाची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:37+5:302021-02-26T04:27:37+5:30

पुढील आदेश येईपर्यंत नगर-मनमाड रोडवरील रात्री दहा ते पहाटेपर्यंत हॉटेल सुरू दिसल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. कोरोनाच्या ...

The hotel owner fled after the police arrived | पोलीस आल्याने हॉटेल मालकाची पळापळ

पोलीस आल्याने हॉटेल मालकाची पळापळ

पुढील आदेश येईपर्यंत नगर-मनमाड रोडवरील रात्री दहा ते पहाटेपर्यंत हॉटेल सुरू दिसल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. तरीही राहुरी फॅक्टरी येथील कारखाना पेट्रोल पंपासमोरील अनेक हॉटेल रात्री एक वाजता सुरू होते. ही बाब गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ हॉटेलकडे मोर्चा वळविला. त्यामुळे एकच पळापळ झाली. राहुरी कारखाना परिसरात सुरू असलेल्या हॉटेलवर ऊस तोडणी कामगार, वाहन चालक, परराज्यातील प्रवासी, त्याचबरोबर स्थानिक गर्दी असते. पोलीस निरीक्षक गाडे यांनी हॉटेल चालकास चांगलाच दम भरला व संचार बंदी कालावधीत हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले.

...................

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने राहुरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करावे. या दरम्यान कोणत्याही आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याचबरोबर विनाकारण व्यक्ती फिरताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.

- हनुमंत गाडे,

पोलीस निरीक्षक, राहुरी

Web Title: The hotel owner fled after the police arrived