हॉटेलमध्ये दारू पिऊन पोलिसाचा धिंगाणा
By Admin | Updated: September 21, 2024 18:33 IST2014-05-21T00:09:29+5:302024-09-21T18:33:07+5:30
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील हॉटेलमध्ये सिव्हील ड्रेसवर असलेल्या पोलिसाने वेटरला कट्टा दाखवून बिलाचे पैसे देणार नाही असे धमकावत हॉटेल मालकाला धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली़

हॉटेलमध्ये दारू पिऊन पोलिसाचा धिंगाणा
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील हॉटेलमध्ये सिव्हील ड्रेसवर असलेल्या पोलिसाने वेटरला कट्टा दाखवून बिलाचे पैसे देणार नाही असे धमकावत हॉटेल मालकाला धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली़ टाकळीमियॉ येथील मित्रासमवेत पोलिसाने हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला़ वेटरने बिलाची मागणी करताच मी पोलीस आहे आणि पैसे देणार नाही,असे सांगत कटटा वेटरला दाखविला़ हॉटेलच्या मालकाने मध्यस्थाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनाही पोलिसाने दारूच्या नशेत धक्काबुक्की केली़ हॉटेलच्या मालकाने याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला़ राहुरी पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर सारवासारव करीत होते. (तालुका प्रतिनिधी)