वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:50+5:302021-06-22T04:14:50+5:30
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी गोदावरी बायोरिफायनरीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. दरंदले यांच्या कार्याचा गौरव केला. तालुकाप्रमुख शिवाजी ...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी गोदावरी बायोरिफायनरीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. दरंदले यांच्या कार्याचा गौरव केला. तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्य कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र झटत असून त्यांनी देशात अव्वल दर्जाचे काम करून दाखवले आहे, असे झावरे सांगितले.
कार्यक्रमात परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सेेनेचे सचिव अशोक कानडे, संभाजी जाधव, डॉ. पूजा बोर्डे, शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, सरपंच सतीश कानडे, अशोक कानडे, बाबासाहेब शिंदे, गोरख टेके, तान्हाजी थोरमिशे, राजेंद्र वाळुंज, मधुकर टेके, संभाजी जाधव, गणेश थोरात, मनोज वरकड आदी उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : कोपरगाव शिवसेना
शिवसेनेच्या वतीने कोविड योद्धांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे.
-------