शिरापुरात बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST2020-12-28T04:11:48+5:302020-12-28T04:11:48+5:30

अळकुटी : पारनेर तालुक्यातील शिरापूर (नरसाळेवाडी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या घोड्याचा मृत्यू झाला. मेंढपाळ बिरा माखा खरात हे ...

Horse killed in leopard attack in Shirapur | शिरापुरात बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

शिरापुरात बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

अळकुटी : पारनेर तालुक्यातील शिरापूर (नरसाळेवाडी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या घोड्याचा मृत्यू झाला. मेंढपाळ बिरा माखा खरात हे त्यांच्या मेंढ्यांसह शिरापूर परिसरात आहेत. शनिवारी पहाटे बिबट्या मेंढ्यांच्या कळपाजवळ आला. त्यामुळे मेंढ्या, घोड्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी बिबट्याने एका घोड्यावर हल्ला केल्याचे खरात यांच्या लक्षात आले. त्यांनी बिबट्याला पिटाळले. मात्र तोपर्यंत घोड्याचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी अळकुटी परिसरात घोलप मळा येथे राधू घोलप यांच्या घरामागे बिबट्या बसलेला प्रतीक घोलप यांनी पाहिला. प्रशांत घोलप यांनी बोराटे यांच्या उसाच्या शेतातून डांबरी रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याची दोन पिले पाहिली. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. मेंढपाळाला वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत भोसले, सुभाष नरसाळे, संतोष नरसाळे, आदिनाथ नरसाळे, साई नरसाळे, आनंद नरसाळे, सागर नरसाळे यांनी केली आहे.

Web Title: Horse killed in leopard attack in Shirapur