श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर ) : अहिल्यानगर ते दौड या राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील माऊली मंदीराजवळ मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (रा. काष्टी वय २२ )याच्यासह गाडीतील गजानन जनार्धन पायघन (वय ४७), दुर्पा गजानन पायघन (वय ३६), वैभव गजानन पायघन( वय १९)या आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबंतील करण गजानन पायघन (वय १३) हा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पायघन कुटुंबीय हे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मुळ राहणारे आहेत.
कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात राहत होते. काष्टी येथील मयत चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गेले होते मंगळवारी पहाटे ते त्यांच्या गावाकडून चिंभळे गावाकडे येत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारात माऊली मंदिर परिसरात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकची घारगाव च्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला समोरून जोराचि धडक बसली यात चार जण मृत्यू पावले आहेत.
सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य केले
Web Summary : Near Kolgaon, a truck collided with a car, killing four, including parents and their son. A 13-year-old boy was critically injured. The family hailed from Akole's Patur village and resided in Chimbhale for work.
Web Summary : कोळगाव के पास ट्रक और कार की टक्कर में माता-पिता और बेटे समेत चार की मौत हो गई। 13 वर्षीय लड़का गंभीर रूप से घायल। परिवार अकोले के पातुर गांव का रहने वाला था और काम के लिए चिंभले में रहता था।