शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी

By सुदाम देशमुख | Updated: January 24, 2024 10:15 IST

मृतांमध्ये दोन जण पारनेरचे तीन जण संगमनेरचे तर एक पाथर्डीचा

अहमदनगर: कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्यावर बुधवारी पहाटे तीनच्या दरम्यान  एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून, यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

ढवळपुरी फाट्या नजीक हिवरे कोरडा शिवारातबस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला असून या  तालुक्यात भयानक अपघात ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांतील मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातील तर तिघेजण संगमनेर तालुक्यातील एक जण पाथर्डी तालुक्यातील आहे.तर स्थानिक तरुण मदत करत असताना पत्रा लागल्याने १ जण जखमी झाला आहे.या अपघातात निलेश रावसाहेब भोर -देसवडे ,प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता- पारनेर )अशोक चिमा केदार  जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी-जांबुत खुर्द ( ता - संगमनेर) सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी ) हे मयत झाले आहेत, तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्र लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी देवेंद्र गणपत वाडेकर, व बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेतया घटनेची माहिती मिळतात सहा.पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनाही दाखल होऊन पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात  उत्तरीय तपासणी होणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पाणी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

हिवरे कोरडा शिवारात पहाटे तीनच्या सुमारास एसटी बस ठाणेहून नगरला येत असताना समोर उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला होता त्याला दुसरा ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर पुढे लावून त्यातील मजूर मदत करत होते हे पाहून इको कार चालक थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता त्यावेळी एसटी बस व ट्रॅक्टर ईको गाडीला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे

टॅग्स :Accidentअपघात