आशा, गटप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:45+5:302021-06-16T04:28:45+5:30

आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून बुधवार (दि.१६) पासून कोरोना, तसेच साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा ...

Hope, group promoters march on Zilla Parishad for various demands | आशा, गटप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा

आशा, गटप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा

आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून बुधवार (दि.१६) पासून कोरोना, तसेच साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बुरूडगाव येथील कार्यालयासमोरून या मोर्चास प्रारंभ झाला. आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, सतीश पवार, जयश्री ढगे, निशा गंगावणे, वंदना पेहरे, कल्पना शेंडे, कामिनी खेतमाळस, सोनाली धाडगे, रूपाली घुसाळे, रूपाली बनसोडे आदींसह जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध समस्यांबाबत १५ व १६ जून रोजी लाक्षणिक संप आणि काम बंद आंदोलन घोषित करण्यात आले असून, या पार्श्‍वभूमीवर आंदोलन करण्यात आले. राज्यात ७२ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. माहितीचे अचूक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्हीएचएनएससी सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सभा ही कामे करावी लागतात. त्याकरिता त्यांना दरमहा चार हजार रुपये शासकीय आदेशानुसार मिळाले पाहिजे; पण ती रक्कम पूर्णत: मिळत नाही. याशिवाय त्यांना विविध कामांचा व इतर कामावर आधारित असलेला मोबदला कोरोना पूर्वकाळात मिळत होता. ती रक्कम कामानुसार सरासरी दोन हजार रुपये असते; परंतु त्यांना कोरोना संबंधित काम दररोज आठ तास करूनदेखील सदरची रक्कम मिळणे बंद झाले आहे. गटप्रवर्तक या पदवीधर महिला असून, त्यांना पंचवीस आशा स्वयंसेविकांवर सनियंत्रण ठेवावे लागते. त्याकरिता त्यांना दरमहा ११ हजार ६२५ मानधन मिळते. त्यातील बरीचशी रक्कम ग्रामभेटी देताना प्रवासापोटी खर्च होते. त्यामुळे त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे.

---

----------फोटो - १५आशा कर्मचारी मोर्चा

कोरोनाच्या संकटकाळात फ्रंटलाइन वर्करची भूमिका बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना कोरोनाकाळात केलेल्या कामाचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Hope, group promoters march on Zilla Parishad for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.