...यापुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही-अभिषेक कळमकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 16:27 IST2019-09-22T16:26:39+5:302019-09-22T16:27:14+5:30
आम्ही शांत आहोत पण कमकुवत नाहीत. माथेफिरु, समज नसलेल्यांकडून कालचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतोय. कोणाला बसवायचे. कोणाला उठवायचे हे जनता ठरवते. यापुढे असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्टÑवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार जगताप यांना त्यांचे नाव न घेता दिला.

...यापुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही-अभिषेक कळमकर
अहमदनगर : आम्ही शांत आहोत पण कमकुवत नाहीत. माथेफिरु, समज नसलेल्यांकडून कालचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतोय. कोणाला बसवायचे. कोणाला उठवायचे हे जनता ठरवते. यापुढे असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्टवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार जगताप यांना त्यांचे नाव न घेता दिला.
राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे शनिवारी नगरला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त आले होते. मेळावा झाल्यानंतर पवार यांची शहरातून पाठ फिरताच कळमकर यांना जगताप समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर कळमकर रविवारी पत्रकारांशी बोलत होते.
काही लोक नेत्यांपुढे आपले काम दाखविण्यासाठी अशा गोष्टी करतात. काही जणांच्या मनात राग आहे. त्यांच्यात समजूतदारपणा नसल्याने शनिवारच्या राष्टवादी काँग्रेसच्या मेळाव्याला गालबोट लागले. मात्र कोंबडा झाकला तरी तो झाकत नसतो. मात्र काही लोक विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आपण तक्रार मागे घेतली आहे. पण यापुढे चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणार नाही, असा इशाराही कळमकर यांनी यावेळी दिला.