पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:29+5:302021-04-04T04:21:29+5:30
काष्टी : मांडवगण फराटा चौकीत पोलीस काॅन्स्टेबल असलेले राहुल बाळासाहेब भागवत यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा ...

पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत यांचा गौरव
काष्टी : मांडवगण फराटा चौकीत पोलीस काॅन्स्टेबल असलेले राहुल बाळासाहेब भागवत यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा येथील फराटे पाटील शैक्षणिक संकुलाकडून गौरविण्यात आले.
वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव फराटे यांच्या हस्ते राहुल भागवत यांचा गौरव करण्यात आला.
राहुल भागवत म्हणाले, शिक्षण घेत असतानाच पोलीस उपनिरीक्षक होण्याची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. नोकरी करत असताना हे स्वप्न साकार झाले. राहुल फराटे म्हणाले, भागवत यांनी नोकरी करत असताना कठोर परिश्रम घेतले आणि पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली याचा अभिमान आहे.
--
०३ फराटे
फोटो
पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत यांचा गौरव करताना फराटे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजीव फराटे व इतर