पवार कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:16+5:302021-07-20T04:16:16+5:30
पाचेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या हिवाळी २०२०-२१ परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. त्यानिमित्त नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील ...

पवार कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पाचेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या हिवाळी २०२०-२१ परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. त्यानिमित्त नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ नुकताच महाविद्यालयात पार पडला.
शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या हिवाळी २०-२१ सालाच्या औषधनिर्माणशास्त्र पदवी परीक्षेकरिता द्वितीय वर्षासाठी ६० तर तृतीय वर्षासाठी १०९ विद्यार्थी बसले होते. परीक्षेत सर्व मुले उत्तीर्ण झाली असून महाविद्यालयात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. दादासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, परीक्षा विभाग प्रमुख अभिजित शेटे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.