कर्जत पंचायत समितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST2021-02-09T04:22:56+5:302021-02-09T04:22:56+5:30

कर्जत : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच इयत्ता दहावी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांचे पंचायत ...

Honoring meritorious students in Karjat Panchayat Samiti | कर्जत पंचायत समितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कर्जत पंचायत समितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कर्जत : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच इयत्ता दहावी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांचे पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना मानचिन्हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षस्थानी सभापती अश्विनी कानगुडे होत्या. उपसभापती हेमंत मोरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी सभापती साधना कदम, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, ज्योती शिंदे, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते.

देशमुखवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संभाजी रावते यांनी मार्गदर्शन केलेल्या पाचवीच्या वर्गातील सहा मुले जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी केले. सूत्रसंचालन बाबा पवार यांनी केले. यावेळकी शरद सुद्रीक, विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड, देवराम लगड, केंद्रप्रमुख उदयभान खराडे, शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.

फोटो ०८ कर्जत पंचायत समिती

देशमुखवाडी शाळेतील विद्यार्थी ओम मोढळे याचा सन्मान करताना पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे.

Web Title: Honoring meritorious students in Karjat Panchayat Samiti