गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:36 IST2021-02-18T04:36:16+5:302021-02-18T04:36:16+5:30

कोपरगाव : येथील पाथरवट समाजाचे वतीने समाजातील दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सूर्यतेज ...

Honoring meritorious students | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कोपरगाव : येथील पाथरवट समाजाचे वतीने समाजातील दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सूर्यतेज संस्था संस्थापक सुशांत घोडके, शेखर नवलपुरे हे उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष कल्पेश टोरपे यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष संजय धानके यांनी कार्यक्रम घेण्याबद्दलची भावना प्रकट केली.

महिला आघाडी अध्यक्षा राजश्री टोरपे यांनी व सौरभ भोईर, सुनील टोरपे, डॉ. कौस्तुभ भोईर, कल्याणी भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पेश टोरपे, प्रताप केने, सागर टोरपे, रवींद्र भगत, अनिल भोईर, परशुराम टोरपे, अनिल आमले, महेंद्र टोरपे, महेश डोंगरे, जितेंद्र टोरपे, मधुकर कुडके, अभय गगे, हेमंत भोईर, लक्ष्मण आमले, राजश्री टोरपे, कल्याणी भोईर, शिलताई भगत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Honoring meritorious students