आनंदवाडीतील ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:17 IST2021-01-09T04:17:30+5:302021-01-09T04:17:30+5:30

जामखेड : तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या सात पैकी पाच सदस्यांची बिनविरोध निवड झाली. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ...

Honoring Gram Panchayat members in Anandwadi | आनंदवाडीतील ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

आनंदवाडीतील ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

जामखेड : तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या सात पैकी पाच सदस्यांची बिनविरोध निवड झाली. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते त्या सदस्यांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.

शिंदे म्हणाले, आनंदवाडी ग्रामपंचायतमधील सात पैकी पाच सदस्य ग्रामस्थांनी भाजपचेच निवडले आहेत. त्यांची एकमताने बिनविरोध निवड केली. दोन जागेवर समझोता झाला नाही; मात्र तेही आमच्याच विचाराचे असून निवडून येणार आहेत. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे जनता आजही आमच्यावर विश्वास ठेवून आहे. भारत महादेव होडशिळ, बबन धोंडिबा जायभाय, नीलावती परमेश्वर गीते, सोजरबाई लक्ष्मण राख, प्रकाश दगडू गीते हे पाच सदस्य निवडून आले आहेत. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारले, वैजीनाथ सांगळे, भीवा खाडे, सुजित खाडे, रावसाहेब सांगळे, हनुमान सांगळे, माजी सरपंच गणेश खाडे, विक्रम सानप, गणेश सांगळे, भारत जायभाय, स्वप्नील खाडे आदी उपस्थित होते.

फोटो : ०८ जामखेड शिंदे

आनंदवाडी येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान केला.

Web Title: Honoring Gram Panchayat members in Anandwadi