कोपरगावात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:33+5:302021-02-05T06:40:33+5:30

कोपरगाव : कोपरगाव शहरातील मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या संकल्पनेतून कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन ...

Honoring the cleaning staff in Kopargaon | कोपरगावात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

कोपरगावात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

कोपरगाव : कोपरगाव शहरातील मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या संकल्पनेतून कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आढाव म्हणाले, गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, शहर स्वच्छतेचे व्रत कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मनोभावे निभावले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या महामारीतही शहरातील नागरिकांचा इतर साथीच्या आजारांपासून बचाव झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करणे अत्यंत महत्वाचे होते. शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मित्र फाऊंडेशनकडून २६ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी मित्र फाऊंडेशनच्या बाजारतळ येथे आयोजित कार्यक्रमात स्वच्छता कर्मचारी अजय हाडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष बरिंदरसिंग शेखो, सागर लाहोटी, दीपक मैदळ, आकाश आमले, रविंदर ढमाळे, विक्रांत शिंदे, देव बागुल, प्रसाद नरोडे, बाळासाहेब मेहथानी, राहुल आढाव, राकेश डोंगरे, भूषण नरोडे, स्वप्नील कुलकर्णी, सौरभ होते, विक्रांत कुदळे, भैया कानडे, प्रशांत कानडे, मनील नरोडे, गजू कोतकर, श्रीकांत नरोडे, रवींद्र सोनवणे, निखील गुजराथी, चंद्रकांत वाघमारे, सिद्धार्थ डोंगरे, दीपक नरोडे, साई नरोडे आदी मित्र फाऊंडेशनचे सर्व सदस्य, बाजारतळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...............

फोटो२८- स्वच्छता कर्मचारी सन्मान - कोपरगाव

280121\img-20210128-wa0033.jpg

कोपरगाव शहरातील मित्र फाउंडेशचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी स्वछता कर्मचार्यांचा सत्कार केला. 

Web Title: Honoring the cleaning staff in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.