महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने संगमनेर नगरपरिषदेचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:20+5:302021-06-06T04:16:20+5:30
माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपवणुकीबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. ...

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने संगमनेर नगरपरिषदेचा सन्मान
माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपवणुकीबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ, हरित, सुंदर संगमनेर अंतर्गत राबविलेल्या विविध योजनांमुळे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संगमनेरची निवड झाली आहे. संगमनेर शहर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, आर्थिक समृद्धी सह प्रगतशील शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा, गंगामाई घाट सुशोभिकरण, विविध रस्त्यांचे सुशोभिकरण, शहरात असलेल्या विविध बागा, स्वच्छतेला दिले जाणारे प्राधान्य,घंटागाडी, बंदिस्त गटारे, विविध ठिकाणचे सुशोभिकरण, परसबाग निर्मिती सुका व ओला कचराचे वर्गीकरण कचऱ्यापासून गॅस निर्मिती अशा अनेक उपाययोजनांमुळे संगमनेर शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने संगमनेर शहराची निवड केली आहे.