ऋषितुल्यांचा सन्मान सुसंस्कृतपणाचे लक्षण
By Admin | Updated: August 31, 2014 23:59 IST2014-08-31T23:41:11+5:302014-08-31T23:59:55+5:30
पाथर्डी : ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून अशा कार्यक्रमांनी त्यांची उर्मी वाढते, असे प्रतिपादन प्रसिध्द कविवर्य नारायण सुमंत यांनी केले.

ऋषितुल्यांचा सन्मान सुसंस्कृतपणाचे लक्षण
पाथर्डी : ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून अशा कार्यक्रमांनी त्यांची उर्मी वाढते, असे प्रतिपादन प्रसिध्द कविवर्य नारायण सुमंत यांनी केले.
येथील कालिका देवी मंदिरात माजी नगरसेवक बंडू पा. बोरूडे, नगरसेविका ज्योती बोरूडे यांच्या मित्रधन परिवाराच्यावतीने शहरातील अकरा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रशेखर घुले हजर होते.
शहरातील सत्कारार्थी
श्यामसुंदर शर्मा, मोहनराव गाडे, रंगनाथ बोरूडे, गोपालकृष्ण मंत्री, भाऊसाहेब इधाटे, सिंधूूताई शिरसाट, मारूतराव मर्दाणे, रखमाजी बालवे, गजानन कोष्टी, हाजी खुर्शिद जनाब, हस्तीमल गांधी यांना यावेळी गौरविण्यात आले.
मान्यवरांची भाषणे
नारायण सुमंत यांनी विनोदी शैलीत सादर केलेल्या कवितांमुळे प्रेक्षकांना सुमारे दोन तास खिळवून ठेवले. ‘रिमझीम पाऊस पडे सारखा’ या विडंबन काव्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. आ. घुले, प्रताप ढाकणे यांचीही भाषणे झाली.
बंडू बोरूडे यांनी प्रास्ताविक केले. सीताराम बोरूडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर हजर होते. अशोक व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक चाँद मणियार यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)