अहमदनगर : नगर तालुक्यातील डोंगरगण येथील भूमिपुत्र विकास वसंत पवार यांनी सैन्यदलात सेवा करताना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सेना पदक मिळविले. या जवानाचा फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्थेने सन्मान चित्र देऊन सपत्नीक सन्मान केला.
डोंगरगण येथे जवानाच्या घरी जाऊन हा सन्मान करण्यात आला. १५ जानेवारी रोजी सेना दिनाच्या औचित्यावर सेना प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड मैदानावर विकास पवार यांना सेनापदक प्रदान करण्यात आले. विकास पवार हे मूळचे जेऊर येथील चाफेवाडीचे रहिवासी आहेत. यावेळी संस्थेचे सचिव राहुल जोशी, मच्छिंद्र इंगळे, चंद्रकांत कदम, सदाशिव पवार, रणजित कर्डिले, शिवम चेमटे, उपेंद्र कर्पे, नागेश सोनवणे, संदीप सोनवणे, मंगेश पाटेकर, सचिन खटावकर, सुनील शिरसूल, गणेश गायकवाड, प्रवीण सांगळे, सतीश पवार, बाबा सय्यद उपस्थित होते.
फोटो : २४ जवान
डोंगरगण येथील जवानाचा फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्थेने सन्मान चित्र देऊन सपत्नीक सन्मान केला.