शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पोलिसांच्या माणुसकीतून लॉकडाऊनमध्ये शिर्डीत अडकलेल्या कुटुंबाची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:58 IST

साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून झालेली घरवापसी झाली.

प्रमोद आहेर । 

शिर्डी : साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून झालेली घरवापसी झाली.

नालासोपारा येथील डावरे कुटुंब चप्पल शिवण्याचा धंदा करतात. योगेश पुंडलिक डावरे (वय-२१) हा क्षयरोगाने आजारी होता. भाऊ दिनेश, वडील पुंडलिक डावरे व आत्या सुमनबाई जाधव हे वीस हजार रूपये घेऊन मनमाडमधील दवाखान्यात उपचारासाठी आले होते.  तेथे काही दिवस उपचारानंतर जवळचे पैसे संपले. जवळच शिर्डी असल्यामुळे साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिर्डीत येऊन दर्शन घेतले. लॉकडाऊन सुरू झाला. अन डावरे कुटुंब शिर्डीत अडकले़ बसस्थानकावरच आठ-दहा दिवस काढले. प्रशासनाने निघोज येथील पालखी निवा-यात त्यांना पाठवले.  योगेशची तब्येत बिघडल्याने सरकारी डॉक्टरांनी लोणी येथे पाठवले़. तेथून त्यांना नगरला पाठवण्यात आले़. नगरला दहा दिवस उपचार करून त्यांना पुन्हा शिर्डीला पाठवण्यात आले. कसेतरी ते दिवस काढत होते. नातेवाईकांनीही पैसे पाठवयाला नकार दिल्याने अक्षरश: भिक्षेक-यांचे जीवन वाट्याला आले़. 

२२ मे रोजी सायंकाळी एका दुकानासमोर आश्रयाला असलेल्या योगेशने डोळे मिटले़ त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पण उपयोग झाला नाही़. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व शिर्डी पोलिसांनी या मुलाचा अंत्यविधी पार पाडला. त्यानंतर पोलिसांनी बेघर लोकांची धरपकड केली. तेव्हा या कुटुंबाने आपली व्यथा वाकचौरे यांच्यासमोर मांडली. वाकचौरे यांनी नगरपंचायतमधून योगेशचा मृत्युचा दाखला काढून देत कुटुंबाला  मदत करत नालासोपा-याला पाठवून दिले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीPoliceपोलिसSocialसामाजिक