निंबोडी येथे घर निहाय चोरीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:27+5:302021-07-16T04:15:27+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील निंबोडी गावासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होऊ लागल्या आहेत. प्रत्येक घराला याची झळ ...

Home-wise burglary at Nimbodi | निंबोडी येथे घर निहाय चोरीची झळ

निंबोडी येथे घर निहाय चोरीची झळ

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील निंबोडी गावासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होऊ लागल्या आहेत. प्रत्येक घराला याची झळ बसली आहे. यातून लाखो रूपयांचा ऐवज चोरीला गेला. या चोरांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा. त्यांना शोधून काढावे, अशी मागणी सरपंच मंगल म्हस्के यांनी केली आहे.

सरपंच म्हस्के यांनी निवेदनात म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून निंबोडी गावासह परिसरात सातत्याने घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. दोन-चार दिवसाला गाव वाडीवस्तीवर चोरी झाल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार या गावात व परिसरात चोऱ्या होत असून नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील आंबादास म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, रावसाहेब म्हस्के, किशोर म्हस्के, रवींद्र भापसे यांच्यासह दुर्योधन म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी देखील चोरांनी हात साफ केला आहे.

या घडलेल्या चोऱ्यांमधून लाखो रूपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. त्यामुळे या झालेल्या सर्व चोऱ्यांचा पोलिसांनी तपास करावा व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. चोरांचा तपास न लागल्यास निंबोडी फाटा येथे ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच म्हस्के यांनी दिला आहे.

Web Title: Home-wise burglary at Nimbodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.