कोरोना एकल समितीच्या कार्यकर्त्यांकडून गृहभेटीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:40+5:302021-08-14T04:25:40+5:30
भेंडा : जानेवारी २०१९ पासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेटून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व विविध शासकीय सुविधा, सवलती ...

कोरोना एकल समितीच्या कार्यकर्त्यांकडून गृहभेटीला सुरुवात
भेंडा : जानेवारी २०१९ पासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेटून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व विविध शासकीय सुविधा, सवलती मिळविताना येणाऱ्या समस्या यांची माहिती घेण्यास गृहभेटीद्वारे कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.
नेवासा तालुक्यात कोरोनामुळे मागील दोन वर्षांत ५० वर्षे वयाच्या आतील ११० पुरुष व १५ महिलांचे निधन झाले. या सर्वांना १८ वर्षांच्या आतील २०५ अपत्ये असून त्यात १०५ मुले व १०० मुलींचा समावेश आहे. ११० महिला ५० वर्षे वयाच्या आतील असून त्या एकल (विधवा) झाल्या आहेत. त्यांच्यावरच कुटुंबाचा बोजा पडलेला आहे. त्यांचे अर्ज भरून योग्य त्या ठिकाणी सादर करणे, यासह इतर प्रश्नांबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
भेंडा येथून या अभियानास कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक कारभारी गरड, काॅ. भारत आरगडे, काॅ. अप्पासाहेब वाबळे यांनी सुरुवात केली.
120821\4916img-20210808-wa0123.jpg
फोटोओळी
भेंडे - कोरोनामुळे एकल ( विधवा) झालेल्या उषा भरत भालेराव यांच्या घरी भेट देऊन विविध समस्या व अडचणींची माहिती घेऊन मार्गदर्शन करताना कोरोना एकल पुनर्वसन समितीचे कारभारी गरड ,भारत आरगडे , अप्पासाहेब वाबळे .