होमगार्ड प्रशिक्षण, भरती ठप्प
By Admin | Updated: March 20, 2016 23:16 IST2016-03-20T23:09:49+5:302016-03-20T23:16:25+5:30
अहमदनगर : पोलीस दलाला सहकार्य करणारे गृहरक्षक दलाचे प्रमुख जिल्हा समादेशक हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. हीच अवस्था राज्यातील अन्य जिल्ह्यातही आहे.

होमगार्ड प्रशिक्षण, भरती ठप्प
अहमदनगर : पोलीस दलाला सहकार्य करणारे गृहरक्षक दलाचे प्रमुख जिल्हा समादेशक हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. हीच अवस्था राज्यातील अन्य जिल्ह्यातही आहे. जिल्हा समादेशक पद रिक्त असल्याने होमगार्डचे प्रशिक्षण, भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे. पद रिक्त असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला मदत करण्यातील अडथळे निर्माण झाले आहेत.
जिल्हा गृहरक्षक दल (होमगार्ड) हे पोलीस दलाला कायदा-सुव्यवस्था राखण्यासासाठी मदत करते. महिला, पुरुष होमगार्डमुळे बंदोबस्तासाठी पोलीस दलाला मोठी मदत होते. सध्याही होमगार्डमध्ये दीड हजार कर्मचारी काम करीत आहेत. जिल्हा समादेशक यांच्याकडे होमगार्डचे व्यवस्थापन आहे. हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा कार्यभार सध्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे आहे. मात्र, त्यांना दैनंदिन कामातून होमगार्डकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य नसते. होमगार्डचे प्रशिक्षण, मानधन, पदोन्नती, भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे.