नगरमध्ये घर खरेदी महागणार
By Admin | Updated: April 2, 2016 00:35 IST2016-04-02T00:27:54+5:302016-04-02T00:35:17+5:30
अहमदनगर : नगर शहरातील सदनिकांच्या रेडीरेकनर दरात सरासरी पाच ते आठ टक्के वाढ झाली आहे़़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे़

नगरमध्ये घर खरेदी महागणार
अहमदनगर : नगर शहरातील सदनिकांच्या रेडीरेकनर दरात सरासरी पाच ते आठ टक्के वाढ झाली आहे़़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे़ मध्यवर्ती शहरातील नवी पेठ, बोल्हेगाव, मनमाडरोड परिसरात आठ टक्के तर बालिकाश्रम रस्ता परिसरात नऊ आणि औरंगाबाद महामार्ग परिसरात सर्वाधिक दहा टक्के वाढ झाली आहे़ त्याखालोखाल पाईपलाईन, पुणे महामार्ग, केडगाव, बुरुडगाव उपनगरांत सात टक्के वाढ झाली आहे़ ही दरवाढ शुक्रवारपासून लागू झाल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे़
प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी रोजी नवीन रेडीरेकनरचे दर लागू केले जात होते़ यंदापासून ते नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय सरकारने डिसेंबरमध्ये घेतला होता़ त्यानुसार सरकारने शुक्रवारी नवीन दराची घोषणा केली़
राज्यात सरासरी सात टक्के दरवाढ झाली़ परंतु नगर शहरात रेडीरेकनरचे दर ५ ते १० टक्के इतके वाढले आहेत़ सर्वाधिक दरवाढ औरंगाबाद महामार्ग परिसरात झाली आहे़ त्या तुलनेत चितळेरोड, दिल्लीगेट, जुना कापडबाजार, नागापूर शिवरस्ता, बुरुडगाव, पुणे बाह्यवळण रस्ता, दौंडरोड, पुणे महामार्ग आणि भिस्तबाग चौक परिसरात नाममात्र म्हणजे ५ ते ७ टक्क्यांची वाढ झाली आहे़ औरंगाबाद, मनमाड आणि बोल्हेगाव परिसरातील घर खरेदी महागली आहे़ पण, इतर उपनगरांत घर खरेदी करणाऱ्यांना या दरवाढीची झळ बसणार नाही़ भूखंडाच्या रेडीरेकनर दरात सरासरी सात टक्के वाढ झाली आहे़ शहरात जमीन घेणाऱ्यांनाही वाढीव दराने कर भरावा लागणार आहे़
(प्रतिनिधी)