अकोलेत सर्वपक्षीयांतर्फे नव्या कृषी विधेयकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 17:15 IST2020-09-25T17:15:06+5:302020-09-25T17:15:48+5:30
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची अकोलेत शुक्रवारी होळी केली. यावेळी तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रसेवादल व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणाचा जाहीर निषेध केला.

अकोलेत सर्वपक्षीयांतर्फे नव्या कृषी विधेयकाची होळी
अकोले : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची अकोलेत शुक्रवारी होळी केली. यावेळी तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रसेवादल व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणाचा जाहीर निषेध केला.
शुक्रवारी दुपारी मार्क्सवादी किसान सभेचे राज्यसचिव डॉ.अजित नवले व राष्ट्रवादीचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वसंत मार्केटसमोर विधेयकाची होळी केली. यानंतर मोर्चा तहसील कचेरीवर नेण्यात आला.
यावेळी कॉ.कारभारी उगले, अॅड.शांताराम वाळुंज, विनय सावंत, मच्छिंद्र धुमाळ, चंद्रकांत नेहे, महेश नवले यांची भाषणे झाली. यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.