आयटकच्या वतीने कामगार कोडची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:47+5:302021-02-05T06:38:47+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी आयटकच्या वतीने येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगार कोड (संहिता)ची ...

आयटकच्या वतीने कामगार कोडची होळी
अहमदनगर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी आयटकच्या वतीने येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगार कोड (संहिता)ची होळी करण्यात आली.
यावेळी कामगारविरोधी असलेला २९ सप्टेंबर २०२० रोजीचा औद्योगिक संबंध कायदा कोड रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कामगार व शेतकरीविरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, दीपक शिरसाठ, सतीश पवार, राजू नन्नवरे, संतोष ठोंबरे, सुरेश आदमाने आदी सहभागी झाले होते. श्रम सुधारणाच्या नावावर ४४ कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने केलेला चार कोड अमलात आणू इच्छित आहे. त्यासाठी राज्यांना त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. कामगार कायदे रद्द करून कामगारविरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आयटकच्या वतीने देशव्यापी चार कोडच्या बिलाची होळी करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कॉ. भारती न्यालपेल्ली म्हणाल्या की, कामगारांनी आणि संघटनांनी वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळवलेले कामगार कायद्यांचे संरक्षण केंद्रातील मोदी सरकारने एका झटक्यात संपवलेले आहे. आपला कृषिप्रधान भारत देश हा कामगार आणि शेतकरी या घटकांमुळेच विकसित झालेला आहे. कामगारांनी श्रम करून देशाचे उत्पन्न आणि साधने निर्माण केली आहेत. परदेशी भांडवलदारांना एफडीआयचे रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांना पाहिजे तसे भारतीय कामगारांच्या श्रमाची लूट करण्याचा खुला परवाना या सरकारने दिला असल्याचा आरोप त्यांनी केला.
फोटो ०३ होळी -केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आयटकच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून कामगार कोड (संहिता)ची होळी करण्यात आली. यावेळी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, दीपक शिरसाठ, सतीश पवार, राजू नन्नवरे, संतोष ठोंबरे, सुरेश आदमाने आदी.