कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:23+5:302021-06-06T04:16:23+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, ...

कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, फिरोज शेख, दीपक शिरसाठ सहभागी झाले होते. कोरोना नियमनांचे पाळन करून हे आंदोलन करण्यात आले.
५ जून २०२० रोजी रोजी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. या अध्यादेशाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेसहित सर्व शेतकरी समर्थक संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही कृषी कायदे रद्द करा, कृषी निविष्ठा, बी-बियाणे, औषधे यांना जीएसटी मुक्त करा, शेतमालाला हमी भावासाठी कायदा करा, कोरोना लस सर्वांना मोफत द्या, डिझेल पेट्रोल वरील अबकारी कर कमी करून त्याचे भाव कमी करा, कांदा, बटाटा व इतर कृषी मालाला किमान हमी भाव जाहीर करा या मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून इशारा दिवस पाळण्यात आला.
६ जून २०१८ रोजी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हमीभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजप सरकारने गोळीबार केला होता व त्यात सहा शेतकरी शहीद झाले होते. त्यानंतरच देशव्यापी शेतकरी आंदोलन उभे राहिले. त्या शेतकरी शहिदांना आदरांजली म्हणून रविवारी (६ जून) रोजी संकल्प दिवस पाळला जाणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
.................
०५ किसान आंदोलन
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्यावतीने कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.