कंटेनर व मालवाहू टँकरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:48+5:302021-05-28T04:16:48+5:30

संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर (एचआर ५५, एएफ ३५१५) व लोणीहून नाशिकच्या दिशेने ५० टन सिमेंट घेऊन चाललेल्या ...

Hit of container and cargo tanker | कंटेनर व मालवाहू टँकरची धडक

कंटेनर व मालवाहू टँकरची धडक

संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर (एचआर ५५, एएफ ३५१५) व लोणीहून नाशिकच्या दिशेने ५० टन सिमेंट घेऊन चाललेल्या मालवाहू टँकरची (एमएच १३, सीयु ३५४९) धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात मालवाहू टँकरची चार चाके धडीसहित निखळली. अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जाऊन धडकला, दरम्यान कंटेनर चालक कंटेनरमधून कागदपत्रांची फाईल घेऊन उडी मारून पसार झाला. तर या अपघातात मालवाहू टँकर चालक बाबू दाऊद शेख (रा. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. जखमीस संगमनेर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर घराजवळ उभी असलेली महिला विमल शंकर उपाध्ये (वय ५५) ही महिला देखील जखमी झाली. घरावर कंटेनर धडकल्याने शंकर उपाध्ये यांच्या घरातील पाच सदस्य बालंबाल बचावले.

फोटो : Talegaon Acsident

तळेगाव दिघे : येथील चौफुलीवर मालवाहू कंटेनर व मालवाहू टँकरची धडक होत झालेल्या भीषण अपघाताची ही दृश्य.

Web Title: Hit of container and cargo tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.