ऐतिहासिक भातोडी तलावाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 16:18 IST2017-09-22T16:18:08+5:302017-09-22T16:18:25+5:30
नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी येथील तलाव जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून ७५० एकर लाभ क्षेत्र असलेला हा तलाव जलमय झाला आहे. तलावाच्या सांडीच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.

ऐतिहासिक भातोडी तलावाला गळती
केडगाव : नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी येथील तलाव जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून
७५० एकर लाभ क्षेत्र असलेला हा तलाव जलमय झाला आहे. तलावाच्या सांडीच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. आता तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी गळती व ओव्हरफ्लोचे पाणी या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होत आहे. तसेच तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी गळती सुरु झाली आहे.
तलावाची गळती न थांबल्यास शेतक-यांसाठी पाणी सहा महिने आधीच संपून जाईल. प्रशासनाचे दुुर्लक्ष झाल्यास मोठी हानी होऊ शकते, असे गावक-यांचे म्हणणे आहे. पाटबंधारे खात्याने तलावाच्या गळतीची तातडीने दखल घेऊन पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.