पंधरा दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:22+5:302021-08-14T04:26:22+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात २८ जुलै रोजी १२२४ इतके सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतरच्या १५ दिवसातील गुरुवारची ११५५ इतकी रुग्णसंख्या ...

पंधरा दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या
अहमदनगर : जिल्ह्यात २८ जुलै रोजी १२२४ इतके सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतरच्या १५ दिवसातील गुरुवारची ११५५ इतकी रुग्णसंख्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर आणि शेवगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. एकीकडे निर्बंध शिथिल झालेले असताना दुसरीकडे रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांसह प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ६९८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत ११५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ३५५ इतकी झाली आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७० आणि अँटिजन चाचणीत ५२४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (१६२), पारनेर (१३७), शेवगाव (११२), अकोले (९५), नगर ग्रामीण (९१), श्रीगोंदा (८४), पाथर्डी (७२), कर्जत (७१), जामखेड (६८), राहुरी (६०), श्रीरामपूर (४८), नेवासा (४५), नगर शहर (३५), राहाता (३१), कोपरगाव (२८), इतर जिल्हा (१५), भिंगार (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान एका दिवसात ८ जणांच्या मृत्यूची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे.
------------
---
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : २,९७,८२४
उपचार सुरू असलेले रूग्ण : ५८३६
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६३५५
एकूण रूग्ण संख्या : ३,१०,०१५
-------------
अशी होती दैनंदिन रुग्णसंख्या
३१ जुलै -१०५०
१ ऑगस्ट-९४३
५ ऑगस्ट-८८८
१० ऑगस्ट-६२८
११ ऑगस्ट-९०८
१२ ऑगस्ट-८५२
१३ ऑगस्ट-११५५
--------