थोरात कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पात उच्चांकी अल्कोहोल उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:34+5:302020-12-15T04:36:34+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखान्याने कायम दिशादर्शक काम केले आहे. सभासद व शेतकरी यांचे हित जपताना ...

थोरात कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पात उच्चांकी अल्कोहोल उत्पादन
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखान्याने कायम दिशादर्शक काम केले आहे. सभासद व शेतकरी यांचे हित जपताना एकरकमी एफआरपीसह उच्चांकी भाव दिला आहे. महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने नवीन ५ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व तीस मेगावॅट वीज प्रकल्पनिर्मिती उभा केला. साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती म्हणून या कारखान्याने १९८४ मध्ये डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली. ४० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अल्कोहल प्रकल्पाचे २०१९ मध्ये मॉडर्नायझेशन करून मल्टीप्रेशर कॉपर कॉलमसह ४० हजार लिटरचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पामधून ५८ हजार ३०० लिटरचे एका दिवसात उच्चांकी अल्कोहल उत्पादन घेतले आहे. कारखान्याने चालू हंगामात आतापर्यंत ३ लाख ५७ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. वीज प्रकल्पातून आतापर्यंत १ कोटी ८६ लाख १७ हजार ४०० वीज युनिट निर्यात करून १२ कोटी ८५ लाखांचे उत्पादन मिळविले आहे. चालू हंगामात या कारखान्याने ४९ दिवसांत चांगले उत्पादन व वीजनिर्मिती केली आहे, असेही ओहोळ यांनी सांगितले.