गुणवडी येथे आदिवासी कुुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:32+5:302021-02-05T06:34:32+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील गुणवडीमध्ये आदिवासी कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दीड लाख रुपये किमतीचे आडवे बोर घेणारे मशीन गावातील बाळासाहेब ...

गुणवडी येथे आदिवासी कुुटुंबाला मदत
केडगाव : नगर तालुक्यातील गुणवडीमध्ये आदिवासी कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दीड लाख रुपये किमतीचे आडवे बोर घेणारे मशीन गावातील बाळासाहेब संभाजी शेळके गुरुजी व त्यांची मुले इंजिनीअर वैभव शेळके, अतुलकुमार शेळके या कुटुंबाने स्वखर्चाने दिले. या वेळी जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर, चिखलीचे रामदास झेंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते आदिवासी कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक वस्तूंचे वाटप केले. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच वाल्मीक नागवडे, माजी सरपंच महेंद्र शेळके, सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश शेळके, उद्योजक रणजीत कुटे, विलास शेळके, डॉ. नितीन शेळके, दत्तात्रय कुटे, बाळासाहेब शेळके मेजर, सूर्यभान नागवडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मारुती शेळके यांनी केले. वैभव बाळासाहेब शेळके यांनी आभार मानले.