सूर्या फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:20+5:302021-08-13T04:26:20+5:30
अहमदनगर : सूर्या फाउंडेशन, पुणे व सोशल सर्व्हिस फाउंडेशन श्रीरामपूर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. न्यू ...

सूर्या फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात
अहमदनगर : सूर्या फाउंडेशन, पुणे व सोशल सर्व्हिस फाउंडेशन श्रीरामपूर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, उक्कलगाव येथील ४० विद्यार्थांना हे साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला इम्पेक्स फर्निचर मॉलचे मालक अविनाश कुदळे उपस्थित होते. ते म्हणाले, गरजू व आर्थिक दुर्बल विद्यार्थांच्या अडचणी पाहून त्यांना मदत करण्याचे काम दोन्हीही संस्था करीत आहेत. गरजवंतांना बाधा येऊ नये म्हणून सर्वांनी सामाजिक बांधीलकी जपत दान केलेल्या शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाट सुखद करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी ‘आरोग्यावर बोलू काही’विषयी मार्गदर्शन त्यांनी केले. महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे रामपाल पांडे समाधानाची व्याख्या सांगितली. सूरज सूर्यवंशी, शुभम विश्वकर्मा यांनी मुलांना करिअरबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी, सचित अधिक, सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश शर्मा, उपाध्यक्ष शुभम विश्वकर्मा यांचे सहकार्य मिळाले. उत्तम गोरे, रंभाजी कोळगे, बबनराव तागड यांची उपस्थिती होती. झाडे लावून कार्यक्रमाची सांगता झाली. (वा.प्र.)
--
फोटो-१२ सूर्या फौंडेशन
सूर्या फौंडेशनतर्फे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.