नागवडे परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:26+5:302021-05-15T04:19:26+5:30
श्रीगोंदा : शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानने नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील शासकीय कोविड ...

नागवडे परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात
श्रीगोंदा : शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानने नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरला औषधे, व्हीलचेअर भेट दिली.
कोरोना ग्राम समितीने वांगदरी येथे ३० बेडची सुविधा असलेले अंबिका कोविड सेंटर सुरू केले आहे.
कोविड सेंटरचे उद्घाटन तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले, नागवडे प्रतिष्ठानने नेहमी सामाजिक जाणिवेतून काम केले. यापुढेही काम करत राहणार आहे. कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीत कोविड सेंटरला अधिक मदत करावी. कोरोनाबाधित रुग्ण होम क्वारंटाइन झाले, तर घरातील इतर सदस्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, मनोहर पोटे, प्रा. सुनील माने, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, पाेलीस निरीक्षक रामराव ढिकले, प्रशांत गोरे, सरपंच आदेश नागवडे, उपसरपंच शिवाजीराव चोरमले, माजी सरपंच महेश नागवडे, संजय नागवडे, विश्वनाथ भुजबळ, माजी सरपंच दगडू सोनलकर, ग्रामविकास अधिकारी अडगळे, हनुमंत काटे, राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक आबासाहेब जगताप यांनी केले, तर बी. बी. गोरे यांनी आभार मानले.
---
१४ नागवडे मदत
श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरला औषधे, व्हिलचेर देताना राजेंद्र नागवडे.