कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:19+5:302021-05-20T04:21:19+5:30

देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. सोशल मीडियावर ...

A helping hand to the Kovid Center on behalf of the Nationalist Congress Party | कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात

कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात

देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. सोशल मीडियावर झालेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला मंगळवारी फळे, अंडी, चिकन आणि मटण आदी पौष्टिक आहार दिला आहे. दररोज हा आहार या शासकीय कोविड सेंटरला दिला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण यांनी केले.

याप्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब कोहकडे, देवळाली प्रवरा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अरुण ढुस, जगदीश ढुस, ऋषिकेश संसारे, डॉ. सुनील कदम, बाळासाहेब लोखंडे, शरिफभाई शेख, सुनील विश्वासराव, भय्या इनामदार, अविनाश लांडगे, पवार साहेब, निलेश तारडे, बाळासाहेब पांडुरंग चव्हाण, बाबासाहेब संसारे, अरुण वाळके, अमजद इनामदार व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: A helping hand to the Kovid Center on behalf of the Nationalist Congress Party